ओम नमो आदेश । गुरूजीं को आदेश । ओम गुरूजी । पानी का
बुंद पवन का थंब, जहा उपजा कल्पवृक्ष का कंध ।
कल्पवृक्ष की छाया, जिसमे गुगुलधुप उपाया ।
जहाँ हुवा धुप का प्रकाश, जव तिल घृतलेके किया वास ।
धुनि धुपाया अग्नी चढाया, सिधका मारक विरले पाया ।
उर्ध्व मुख चढे, अग्नी मुख जले, होम धुप वासना होय ले।
एकीस ब्रम्हाण्ड तैतीस कोटी देव, देवी को होम धुप वास ।
सप्तमे पाताल नवकुली नाग़ वासुकी को होम धुप वास ।
श्री नाथजी की चरण कमल पादुका को होम धुप वास ।
अलील अनाद धर्मराजा धर्म गुरू देव को होम धुप वास ।
धरतरी आकाश पवन पानी को होम धुप वास ।
चांद सुरज को होम धुप वास । ताराग्रह नक्षत्र को होम धुप वास ।
नवनाथ चौरांसी सिध्दों को होम धुप वास ।
सदगुरू श्री जितेंद्रनाथजीं को होम धुप वास ।
सदगुरू श्री भाऊमहाराजनाथजीं को होम धुप वास ।
सदगुरू श्री हठेंद्रनाथजीं को होम धुप वास ।
सदगुरू श्री देवेंद्रनाथजीं को होम धुप वास ।
चैतन्य श्री मच्छिंद्रनाथजीं को होम धुप वास ।
चैतन्य श्री कानिफनाथजीं को होम धुप वास ।
चैतन्य श्री आदिनाथ महादेवजीं को होम धुप वास ।
चैतन्य श्री दत्तात्रय महाराजजीं को होम धुप वास ।
चैतन्य श्री मिरावली बाबा मिरादातार को होम धुप वास ।
स्वामी श्री राघवेंद्रनाथजीं को होम धुप वास ।
थान मान मठ मुकाम को होम धुप वास अग्नी मुख धुप पवन मुख वास ।
ध्यासना वासलो थापना थापलो जहाँ धुप तहाँ देव ।
जहाँ देव तहाँ पुजा । अलख निरंजन और न दुजा ।।
इति मंत्र पढ धुपध्यान करै सो जोगी अमरापूर तरै
बिना मंत्र धुप ध्यान करै खाय जरै न वाचा फुरै ।।
इतना धुप का मंत्र जाप संपुर्ण सही ।।
अनन्त कोटी सिध्दों मे श्री नाथजी कही ।।
श्री नाथजी गुरूजीं को आदेश । आदेश ।। आदेश ।।
दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी ।।
अनाथनाथे अंबे करूणा विस्तारी ।।
वारी वारी
जन्ममरणाते वारी
हारी पडलो आता संकट निवारी ।।१।।
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ।।
सुरवरईश्वर
वरदे तारक संजीवनी ।। जय ।। धृ ।।
त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसे नाही ।।
चारी श्रमले
परंतु न बोलवे काही ।।
साही विवाद करता
पडलो
प्रवाही ।।
ते तु भक्तांलागी ते तु
दासालागे पावसी
लवलाही ।। जय ।।२।।
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।।
क्लेशापासुनी
सोडी तोडी भवपाशा ।।
अंबे तुजवाचूनी कोण
पुरविल
आशा ।।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ।।
जय देवी
जय देवी जय महिषासुरमर्दिनी ।।
सुरवरईश्वर
वरदे
तारक संजीवनी ।। जय ।।३।।
त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।।
नेती
नेती शब्द नये अनुमना
सुरवर मुनिजन
योगी समाधानी ये ध्याना ।।१।।
जय देव जय देव जय श्री गुरूदत्ता
आरती
ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ ।।
सबाह्य अभ्यंतरी तुं एक दत्त
अभ्याग्यासी कैची कळेल ही मात
पराही
परतली तेथे कैचा हा हेत
जन्ममरणाचाही
पुरलासे अंत ।। जय ।।२।।
दत्त येउनिया उभा ठाकला ।।
सद्भावे
साष्टांगे प्रणिपात केला ।।
प्रसन्न होऊनी
आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला
।। जय ।।३।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले
उन्मन ।।
मी तू पणाची झाली बोळवन ।।
एका
जनार्दनी श्री दत्तध्यान जय देव जय देव ।।
जयदेव जयदेव जय नवनाथा माझ्या
मच्छिंद्रनाथा
आरती ओवाळीता हरली भवचिंता
। जयदेव जयदेव जय नवनाथा ।। धृ ।।
कलीमध्ये अवतार नवनारायण ।
दाखविला मार्ग
शाबरी विदयेचा कोण ।
केलासी उध्दार अवघ्या
जगाचा ।
गाईल महिमा नव सिध्दांचा ।। जयदेव
।।१।।
मत्स्यापासून झाले माझे मच्छिंद्रनाथ ।
गोरक्ष जन्मले गौरीभस्मात ।
जालिंदराची उत्पती अग्निकुंडात ।
कानिफाचा जन्म गजकर्णात || जयदेव ।।२।।
भिक्षेच्या पात्रात भर्तृहरी । रेवणनाथ हे
सर्वांना तारी ।
चौरंगी पांगुळ कृष्णेच्या
तीरी ।
वटसिध्द नागनाथ सर्पाचे उदरी ।।
जयदेव ।।३।।
चरणापासून झाले चरपटीनाथ । गर्भाची
उत्पत्ती भागीरथीत ।
गहिनी गोपीचंद
अडबंगीनाथ ।
चौऱ्याऐंशी सिध्द झाले प्रगट
।। जयदेव ।।४।।
ऐसे हे नवनाथ प्रगट झाले । शाबरी विदयेने
जग उध्दारीले ।
झाले दत्तप्रतापी सुरनर
जिंकिले ।
गणेशनाथ श्रीशरण गेले ।। जयदेव
।।५।।