१) ज्या ठिकाणी पारायण करणार आहात ती जागा स्वच्छ करून घेणे. एक चौरंग घेऊन त्याच्यावर स्वच्छ वस्त्र टाकून याभोवती रांगोळी काढावी. नवनाथांचा फोटो ठेवणे, पाच फळ ठेवणे, सुगंधित अगरबत्ती लावणे, पाच विड्याची पाने त्याच्यावर पाच कुलदैवतांच्या नावाने सुपाऱ्या ठेवणे व नाथांच्या नावाने नऊ सुपाऱ्या एक दत्त महाराज आणि एक महादेवांच्या नावाने सुपारी ठेवणे. तसेच एक सुपारी आपल्या गुरूंच्या नावाने ठेवणे. सुपारी ठेवताना त्या त्या देवतांचे व गुरुंचे आव्हान करणे.
२) वड, उंबर, पिंपळ, यांच्या एकत्रित तीन बारीक फांदी बांधून पारायणाच्या ठिकाणी लटकवणे.
३) उजव्या हातात पाणी घेऊन मनात एखादी इच्छा असल्यास ती नवनाथांना सांगुन त्याचा संकल्प करणे व हातातले पाणी जमिनीवर सोडणे.
४) पारायण नऊ दिवसांचे करणे.
५) नऊ दिवस पारायण काळात उपवास करणे.
६) नऊ दिवस तुपाचा दिवा चालू असणे आवश्यक आहे.
७) नऊ दिवस नवनाथांची आरती करणे. पारायण काळात मौन धारण करणे. भांडण करण्याचे टाळावे.
८) पारायण काळात नऊ दिवस चटईवर किंवा घोंगडीवर झोपणे.
९) पारायण काळात ब्रम्हाचर्याचे पालन करणे व मांसाहार करू नये.
१०) तीन वेळा तळहातावर पाणी घेऊन मनात जी इच्छा असेल ती बोलुन संकल्प करणे आणि पाणी जमिनीवर सोडणे.
११) नवव्या दिवशी पारायण समाप्ती केल्यावर अकरा मुले व एक कुमारीका जेवायला घालणे. जेवणाच्या आधी आकरा मुलांचे पाय धुऊन घेणे व त्या मुलांना भगवी कफनी देणे. जेवणामध्ये चपाती, खीर, राजमा, हरभरा, शाकभाजी, दहिवडे, मेथीची भाजी, वरण भात व गुळ मलिदा याचा नवनाथांना नैवेदय दाखवणे.
१२) नवनाथ पारायणाचा प्रसाद जेऊ घातलेल्या ११ मुलांना दक्षिणा देणे.