|| परमपूज्य गुरुवर्य जितेंद्रनाथजी महाराज ||
|| काली रात का रखवाला मच्छिंद्रनाथ बाबा मायंबावाला अलख निरंजन || आदेश ||
मूळ नाव:- प्रफुल्ल चंद्रकांत कुंभार ( जितेंद्रनाथ महाराज )
जन्म :- विजयादशमी , दसरा , २९ सप्टेंबर १९९० .
सांप्रदाय:- नाथ सांप्रदाय
गुरू :- भाऊमहाराज नाथजी , हटेंद्रनाथजी
भाषा:- मराठी, हिंदी , इंग्रजी, बंगाली, भरभरी भाषा
कार्य:- नाथसांप्रदायाचा प्रचार-प्रसार, दुःखी लोकांचे दुःख दूर करून नाथ सेवेत लावणे, (जीव-ब्रम्ह सेवा)
संबंधित तीर्थक्षेत्रे:- वाकड , हिवरे तर्फे नारायणगाव
व्यवसाय:-
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत नोकरी.
(नाथकार्यासाठी सेवानिवृत्ती घेतली)
वडील:-श्री. चंद्रकांत कुंभार (बाबा)
आई:- सौ. संगिता चंद्रकांत कुंभार (आऊसाहेब)
पत्नी:- सौ. शुभांगी प्रफुल्ल कुंभार (माई)
अपत्ये:- शिवांश प्रफुल्ल कुंभार
श्री जितेंद्रनाथजी महाराज
भाऊमहाराज नाथजी व हटेंद्रनाथजी यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य जितेंद्रनाथ यांच्या संकल्पनेतून हिवरे तर्फे नारायणगाव शिवहरीनगर या ठिकाणी “बडेबाबा मच्छिंद्रनाथांचे” भव्य मंदिर असून, या ठिकाणाहून नाथ सांप्रदायाच्या कार्याचा प्रचार प्रसाराचे व दुःखी लोकांचे दुःख दूर करण्याचे कार्य गुरुवर्य जितेंद्रनाथ यांनी हाती घेतले आहे. पण सर्वप्रथम या कार्याची सुरुवात त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून सुरू झाली, या कार्यामागे त्यांच्या आई-वडिलांचे मोलाचे योगदान आहे. लहानपणापासूनच आई-वडील व त्यांचे कुटुंब अध्यात्मिक सेवत असल्या कारणाने घरामध्ये आदिनाथ महादेवांची , दत्तप्रभूंची व नवनाथांची सेवा घरात होत असत, आई-वडिलांच्या या अध्यात्मिक संस्कारामुळे गुरुवर्य जितेंद्रनाथजी यांच्यावर नवनाथांच्या सेवेचा व कार्याचा प्रभाव पडणे साहजिकच होते. यातुनच त्यांनी मच्छिंद्रनाथांचे पुत्र मीननाथ यांची आठ वर्ष रोजची तीन तास ध्यान साधना करत असत. या साधनेतून मीननाथांचा साक्षात्कार झाला व त्यांच्या आदेशानुसार जितेंद्रनाथजी यांनी आदिनाथ महादेवांची कठोर साधना सुरू केली, या साधनेतून महादेवांचा कृपाआशीर्वाद नाथकार्यासाठी मिळाला. महादेवांनी नवनाथांमधील सर्वात प्रथम असणारे नाथजी म्हणजेच “बडेबाबा मच्छिंद्रनाथ” यांची साधना करावयास सांगितले, या साधनेतून “बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी” प्रसन्न होऊन त्यांना नाथ सांप्रदायाचा प्रचार- प्रसार व दुःखी लोकांचे दुःख दूर करण्याचे आदेश दिले. तसेच सर्व देवी देवतांना प्रसन्न करवून दिले. गुरुवर्य जितेंद्रनाथांना गुरु नसल्याकारणाने “बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी” सर्वप्रथम गुरुवर्य जितेंद्रनाथांना देहरूपी गुरु करावयास सांगितले, कारण की गुरुशिवाय ज्ञान नाही. परंतु नाथ सांप्रदायाचे कार्य करत असताना गुरु नसल्याकारणाने काही अडथळे निर्माण होत असत, पण “बडेबाबा मच्छिंद्रनाथांच्या” आदेशानुसार प्रथमता भाऊमहाराज नाथजी व त्यांच्या कृपाआशीर्वादाने हटेंद्रनाथजी यांची गुरुकृपा प्राप्त करून घेतली. व खऱ्या अर्थाने नाथ सांप्रदायाच्या कार्यासाठी जितेंद्रनाथजी यांना एक नवसंजीवनीच मिळाली. म्हणूनच म्हटले आहे की,
| मिल जायेंगी तुम्हे तुम्हारी
मंजीले |
वो हवा के रुख भी बदल जायेंगे |
अगर नाथजीने सर पे हाथ रखा
|
तो राह मे बुझे हुए चिराग भी जल उठेंगे |
वरील पंक्तीनुसार जितेंद्रनाथांना नाथ कार्यामध्ये एक आगळे-वेगळे चैतन्य निर्माण झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर जितेंद्रनाथाजी यांचा शिष्य परिवार वाढत असून ज्याप्रमाणे उगवत्या सूर्य नारायणाच्या किरणांचा प्रकाश सर्वदूर पसरतो आहे . त्याचप्रमाणे जितेंद्रनाथजी यांच्या नाथ कार्याचा प्रचार- प्रसाराचा प्रकाश सर्वदूर पसरत आहे.
सर्वप्रथम गुरुवर्य जितेंद्रनाथांनी त्यांच्या राहत्या ठिकाणी वाकडगांव, ता. मुळशी, जि.पुणे येथे “बडेबाबा मच्छिंद्रनाथ शक्तिपीठ” या शक्तीपिठाची स्थापना त्यांचे गुरुवर्य हटेंद्रनाथजी यांच्या कृपाशीर्वादाने केली. व या शक्तिपीठावर गुरुवर्य जितेंद्रनाथांनी महिन्यातील प्रत्येक रविवारी म्हणजेच चार दिवसाची जीव ब्रह्म सेवा चालू केली. ही सेवा सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी “बडेबाबा मच्छिंद्रनाथांची” आरती होईपर्यंत म्हणजेच संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चालते. नाथ सांप्रदायाचा तरुण पिढीचा वाढता कल पाहता व प्रसार पाहता गुरुवर्य जितेंद्रनाथांनी हिवरे तर्फे नारायणगाव शिवहरीनगर या ठिकाणी “बडेबाबा मच्छिंद्रनाथांचे” भव्य दिव्य मंदिराची स्थापना करून भक्तांसाठी आश्रमाची निर्मिती केली व सर्व भाविकांना अन्नदानाची सोय केली.
गुरुवर्य जितेंद्रनाथांनी नाथ सांप्रदायाच्या सेवेसाठी एवढ्यावरच न थांबता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कायमस्वरूपाची (परमनंट) नोकरीचा राजीनामा दिला. आपल्या संपूर्ण परिवाराचा एकधाही मागचा-पुढचा विचार न करता, नवनाथांच्या सेवेसाठी व नाथकार्यासाठी एवढा मोठा त्याग अशा महान नाथयोग्याने केला. अशा महान नाथयोग्याला कोटी कोटी प्रणाम. गुरुवर्य जितेंद्रनाथजी नाथसेवेचे कार्य करत असताना तरुण पिढीला ते कळकळीने सांगतात की ,
२) मदिरापान न करणे व कोणत्याही प्रकारचे व्यसन न करणे.
३) परस्त्री मातेसमान मानने.
४) धन योग्य मार्गातूनच कमावणे.
५) सत्य मार्गाचा अवलंब करणे.
वरील पाचही तत्वांचे काटेकोर पणे आचरण करून प्रत्येक साधकाला नवनाथांचा कृपाआशीर्वाद प्राप्त करता येतो.