• office@badebabamachindranathshaktipeeth.com
  • +९१ ८००७९ ९८५८५ / +९१ ८००७५ ३१०००
  • || “नवनाथांची रोजची चैतन्यमय सोपी पूजा करण्याची विधी” ||

    ज्या साधकांना नवनाथांची सेवा करायची आहे, त्यांनी रोजच्या रोज एक वेळेस नवनाथांचा फोटो असल्यास किंवा ज्यांच्याकडे मूर्ती आहे, त्या नाथांच्या फोटोला किंवा मूर्तीला स्वच्छ वस्त्राने गुलाब पाण्याने पुसून घ्यावयाचे आहे. स्वच्छ पुसून झाल्याच्या नंतर नवनाथांना चंदन टीका लावणे कपाळाला भस्म लावणे व नाथांचे चरणी सुगंधित पुष्प वाहने व अगरबत्ती दाखवणे, दवणा अत्तर असल्यास नवनाथांच्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या खाली असलेल्या वस्त्रांवरती लावणे. जेणेकरून देव घरातील वातावरण चैतन्यमय व प्रसन्न राहील. त्यानंतर लोबान सिंगापुरी धूप नवनाथांचा खालील प्रमाणे धूपमंत्र म्हणत...(मंत्र पुढीलप्रमाणे ...)

    ओम नमो आदेश । गुरूजीं को आदेश । ओम गुरूजी । पानी का
    बुंद पवन का थंब, जहा उपजा कल्पवृक्ष का कंध ।
    कल्पवृक्ष की छाया, जिसमे गुगुलधुप उपाया ।
    जहाँ हुवा धुप का प्रकाश, जव तिल घृतलेके किया वास ।
    धुनि धुपाया अग्नी चढाया, सिधका मारक विरले पाया ।
    उर्ध्व मुख चढे, अग्नी मुख जले, होम धुप वासना होय ले।
    एकीस ब्रम्हाण्ड तैतीस कोटी देव, देवी को होम धुप वास ।
    सप्तमे पाताल नवकुली नाग़ वासुकी को होम धुप वास ।
    श्री नाथजी की चरण कमल पादुका को होम धुप वास ।
    अलील अनाद धर्मराजा धर्म गुरू देव को होम धुप वास ।
    धरतरी आकाश पवन पानी को होम धुप वास ।
    चांद सुरज को होम धुप वास । ताराग्रह नक्षत्र को होम धुप वास ।
    नवनाथ चौरांसी सिध्दों को होम धुप वास ।
    सदगुरू श्री जितेंद्रनाथजीं को होम धुप वास ।
    सदगुरू श्री भाऊमहाराजनाथजीं को होम धुप वास ।
    सदगुरू श्री हठेंद्रनाथजीं को होम धुप वास ।
    सदगुरू श्री देवेंद्रनाथजीं को होम धुप वास ।
    चैतन्य श्री मच्छिंद्रनाथजीं को होम धुप वास ।
    चैतन्य श्री कानिफनाथजीं को होम धुप वास ।
    चैतन्य श्री आदिनाथ महादेवजीं को होम धुप वास ।
    चैतन्य श्री दत्तात्रय महाराजजीं को होम धुप वास ।
    चैतन्य श्री मिरावली बाबा मिरादातार को होम धुप वास ।
    स्वामी श्री राघवेंद्रनाथजीं को होम धुप वास ।
    थान मान मठ मुकाम को होम धुप वास अग्नी मुख धुप पवन मुख वास ।
    ध्यासना वासलो थापना थापलो जहाँ धुप तहाँ देव ।
    जहाँ देव तहाँ पुजा । अलख निरंजन और न दुजा ।।
    इति मंत्र पढ धुपध्यान करै सो जोगी अमरापूर तरै
    बिना मंत्र धुप ध्यान करै खाय जरै न वाचा फुरै ।।
    इतना धुप का मंत्र जाप संपुर्ण सही ।।
    अनन्त कोटी सिध्दों मे श्री नाथजी कही ।।
    श्री नाथजी गुरूजीं को आदेश । आदेश ।। आदेश ।।

    आरती करून झाल्याच्या नंतरुन चैतन्यमय वातावरण तयार होईल व साधकाने स्वच्छ आसन घेऊन अर्ध पद्मासणात किंवा पूर्ण पद्मासनात बसून दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्रावर लक्ष केंद्रित करणे व आज्ञाचक्रात “बडेबाबा मच्छिंद्रनाथांचे” ध्यान करणे व “ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः” या मंत्राच्या ज्याला जमेल तसे रुद्राक्षाच्या माळे वरती ११,२१,३१ व ५१ माळा जप करणे. जेणेकरून आपली आध्यात्मिक प्रगती होईल, आपले तेज आपले चैतन्य वाढेल व घरामध्ये सुद्धा प्रसन्न चैतन्यमय वातावरण निर्माण होईल. आपली संसारातील अध्यात्मातली सर्व कामे मार्गी लागतील. “बडेबाबा मच्छिंद्रनाथांची” व नवनाथांची कृपा आपल्यावरती व साधकांवरती तसेच घरातील इतर सदस्यांवरती राहील. अशाप्रकारे रोजची केली जाणाऱ्या या साधनेतून आपल्याला नवनाथांची व “बडेबाबा मच्छिंद्रनाथांची” अनुभूती व साक्षात्कार येत राहतील.

    आपली आध्यात्मिक प्रगती होईल, यातूनच आपल्याला अध्यात्माची अधिक-अधिक आवड निर्माण होत जाईल व अशाप्रकारे या नवनाथांतील सेवेचा आनंद आपल्याला मिळत राहील. जर प्रत्येक साधकाने व भक्तांनी अशा प्रकारे सेवा केली तर नक्कीच आपल्याला अतिप्रेमळ मायाळू असणाऱ्या चैतन्यरूपी मायास्वरूप “बडेबाबा मच्छिंद्रनाथ दर्शन देतील व त्यांचा साक्षात्कार झाल्या बिगर राहणार नाही. आलख निरंजन आलख निरंजन आलख निरंजन आदेश आदेश आदेश...

    अलख निरंजन आदेश आदेश आदेश . . .