• office@badebabamachindranathshaktipeeth.com
  • +९१ ८००७९ ९८५८५ / +९१ ८००७५ ३१०००
  • || “बडेबाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज” ||

    श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण " म्हणून प्रसिद्द असलेल्या नऊ मुलांनी जगदुद्धारार्थ अवतार धारण केले. त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ जी होय. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि "श्री मत्स्येंद्र" हे नामकरण धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात.

    जगात सर्वात प्रथम श्री महादेवा कडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकविला ते मायारूपी दादागुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथ होत. विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच मायारूपी दादागुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथ होय. शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही. तर देवाधिदेव महादेव आदिमाया पार्वती, भिल्लीणीच्या रुपात असतांना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय, असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजेच मायारूपी बडेबाबा मच्छिंद्रनाथ होय. महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालविण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषीश्रेष्ठ, मायारूपी बडेबाबा मच्छिंद्रनाथ होत.

    अधिक माहिती

    || परमपूज्य गुरुवर्य जितेंद्रनाथ महाराज ||

    || काली रात का रखवाला |
    मच्छिंद्रनाथ बाबा मायंबावाला ||
    अलख निरंजन | आदेश |

    भाऊमहाराजनाथजी व हटेंद्रनाथजी यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य जितेंद्रनाथ यांच्या संकल्पनेतून हिवरे तर्फे नारायणगाव शिवहरीनगर या ठिकाणी “बडेबाबा मच्छिंद्रनाथांचे” भव्य मंदिर असून, या ठिकाणाहून नाथ संप्रदायाच्या कार्याचा प्रचार प्रसाराचे व दुःखी लोकांचे दुःख दूर करण्याचे कार्य गुरुवर्य जितेंद्रनाथ यांनी हाती घेतले आहे. पण सर्वप्रथम या कार्याची सुरुवात त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून सुरू झाली, या कार्यामागे त्यांच्या आई-वडिलांचे मोलाचे योगदान आहे. लहानपणापासूनच आई-वडील व त्यांचे कुटुंब अध्यात्मिक सेवत असल्या कारणाने घरामध्ये आदिनाथ महादेवांची , दत्तप्रभूंची व नवनाथांची सेवा घरात होत असत, आई-वडिलांच्या या अध्यात्मिक संस्कारामुळे गुरुवर्य जितेंद्रनाथजी यांच्यावर नवनाथांच्या सेवेचा व कार्याचा प्रभाव

    पडणे साहजिकच होते. यातुनच त्यांनी मच्छिंद्रनाथांचे पुत्र मीननाथ यांची आठ वर्ष रोजची तीन तास ध्यान साधना करत असत. या साधनेतून मीननाथांचा साक्षात्कार झाला व त्यांच्या आदेशानुसार जितेंद्रनाथजी यांनी आदिनाथ महादेवांची कठोर साधना सुरू केली, या साधनेतून महादेवांचा कृपाआशीर्वाद नाथकार्यासाठी मिळाला. महादेवांनी नवनाथांमधील सर्वात प्रथम

    अधिक माहिती
    -->

    || परमपूज्य सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज ||

    परमपूज्य सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजय कुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान सिद्ध योगी होते. त्यांचा जन्म आषाढ शुद्ध नवमी शके १८५९ (१ ६ जून १९३७) रोजी रायगड जिल्ह्यात पाली येथे झाला. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले श्री देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते त्यामुळे शिस्तप्रियता व्यवस्थितपणा त्यांना प्रिय होता उच्चशिक्षित असले तरीसुद्धा स्वभावात शालीनता होती.

    मुंबईला नोकरीला असताना पोंडीचेरी येथील महान योगी श्री अरविंद घोष यांचे भक्त श्री मुखर्जी यांच्याशी त्यांचा संपर्क आला श्री मुखर्जीनी महाराजांना अनेक चमत्कार करून दाखवले. त्यामुळे महाराज प्रभावित झाले त्यांनी मुखर्जींना आपल्याला गुरुमंत्र देण्याची विनंती केली. पण मुखर्जींनी मी तुझा गुरु नसून लवकरच तुला एक महान सद्गुरु लाभणार आहेत व माझ्यापेक्षाही अनेक मोठे चमत्कार तू स्वतःच करून दाखवशील असे सांगितले. काही दिवसांनी त्यांना आंध्र प्रदेशातील मंत्रालयम येथील समाधी स्थळ श्री राघवेंद्र स्वामींनी दृष्टांत देऊन गुरुमंत्र दिला आणि दीक्षांत नाव देवेंद्र असे ठेवले.

    अधिक माहिती