• office@badebabamachindranathshaktipeeth.com
  • +९१ ८००७९ ९८५८५ / +९१ ८००७५ ३१०००
  • || बडेबाबा मच्छिंद्रनाथ देवस्थान ||

    कलियुगाला प्रारंभ झाल्यावर दुःखी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी व आघोरी दुष्ट विद्या, भानामती, जादूटोणा, काळीविद्या, तांत्रिकविद्या या सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि जनसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आदिनाथ महादेवांनी व विष्णू नारायणांनी नवनाथांना पाचारण करून या सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अवतार घेण्यास सांगितले. नवनाथांतील प्रथम नाथ म्हणजे “बडेबाबा मच्छिंद्रनाथ” त्यानंतर त्यांचे शिष्य गुरु गोरक्षनाथ या दोघांनी नाथ संप्रदायाच्या प्रचार-प्रसारासाठी मोलाचे योगदान देऊन सर्व जगभर व भारतभर नाथ संप्रदायाचा प्रचार-प्रसार व दुःखी लोकांचे दुःख दूर करून आपल्या महातेजस्वी व तपस्येची ऊर्जा लोक कल्याणासाठी वापरली. आपल्या महाराष्ट्राचे परम भाग्यच म्हणावे लागेल की, नवनाथांतील जास्तीत जास्त नाथांच्या समाध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. बडेबाबा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांनी पश्चिम भागात सह्याद्री पर्वत रांगेत काही साधना केल्या व तपस्या केल्या त्याच करत असताना वाई-सातारा या मार्गावरून साताऱ्यामध्ये मच्छिंद्रनाथ गड हेही स्थान प्रसिद्ध आहे. तसेच दोन्हीही नाथ, नाथ संप्रदायाचा प्रसार- प्रचार करत पिंपरी-चिंचवड मधील वाकड या गावात मुळा नदीचा प्रवाह आहे.

    या मुळा नदीमध्ये दोघांनी ही स्नान करून, आत्ता सध्याचे असणारे वाकड मधील “बडेबाबा मच्छिंद्रनाथ शक्तिपीठ” या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले व साधना केली. त्या ठिकाणावरून बडेबाबा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ डुडुळगाव या ठिकाणी आले डुडुळगाव या ठिकाणी अडबंगीनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या साधना केली व त्यांचा उद्धार करण्यासाठी दोघांनी ही त्यांना आशीर्वाद व लोककल्याणाचा आदेश दिला. डुडुळगावावरून पुढे आळंदीला जात असताना “ श्री सिद्धेश्वर महादेवांशी” “बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी” व गोरक्षनाथांनी माऊलींचे अवतार कार्य होणार आहे व त्यांना कोणत्या ठिकाणी समाधीस्थ करायचे याची काही पुढील योजना आखून त्यांच्याशी वार्तालाप करून ते पुन्हा पुढच्या मार्गाला निघाले. त्या ठिकाणाहून प्रसार-प्रचार व दुःखी लोकांचे दुःख दूर करत. खेड-मंचर या मार्गावरून पुढे निघाले त्या मार्गानी पुढे जात असताना नाथांची खूप काही साधनेची ठिकाणे आहेत. त्यातीलच म्हणजे पेठ घाटातील सौरंग्याचा डोंगर त्या ठिकाणी दत्त महाप्रभूंचे महानुभव पंथातील खूप सुंदर ठिकाण आहे, व मंदिर देखील आहे. या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी व दत्तप्रभूंनी खूप कालापर्यंत साधना केलेली आहे. तसेच पुढे जात असताना अवसरीचे गायमुख फाट्याच्या अलीकडे गोरक्षनाथ टेकडी म्हणून प्रसिद्ध आहे. याच गोरक्षनाथ टेकडीवर त्र्यंबकेश्वरला होणारा कुंभमेळा (दर बारा वर्षानी) त्या ठिकाणी जाताना नाथपंथातील नाथांची झुंड या ठिकाणी थांबते. हे पवित्र स्थान आहे की ज्या ठिकाणी दोन्ही महान तेजस्वी नाथांनी साधना केलेली आहे. तसेच ही साधना झाल्याच्या नंतरुन दोन्हीही नाथ पुढे मार्गक्रमण करत असताना पुढे अनेक ठिकाणी बाबांच्या अनेक साधना स्थळी आहेत. व त्यांना मुस्लिम नाव देण्यात आलेले आहे. त्यापैकी एक म्हणजे दावल मलिक बाबा आणि शामादार बाबा व इत्यादी.

    त्र्यंबकेश्वर ला महादेवांचे तेजोमय ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी व नवनाथांची असणारी कुलस्वामिनी सप्तशृंगी माता यांच्या दर्शनाला जात असताना नारायणगाव या ठिकाणी असणारे खोडद-हिवरे आत्ताचे शिवहरीनगर या गावामध्ये मच्छिंद्रनाथांनी व गोरक्षनाथांनी भिक्षा मागितल्यानंतर आत्ता सध्याचे असलेले “बडेबाबा मच्छिंद्रनाथ देवस्थान” या ठिकाणी एक हजार वर्षांपूर्वी दोन्ही नाथांनी मागून आणलेली भिक्षा त्या ठिकाणी ग्रहण केली व काही काळ साधना व तपस्या केली. असे हे पावन पुण्य व महातेजस्वी या दोन नाथ योग्यांच्या चैतन्य स्वरूप महाऊर्जा या “बडेबाबा मच्छिंद्रनाथ देवस्थानाच्या” ठिकाणी आहे. म्हणूनच या ठिकाणाला “बडेबाबा मच्छिंद्रनाथ देवस्थान” , श्री क्षेत्र अशी नाथसंप्रदायातील मोठी ओळख या स्थानाला प्राप्त झाली आहे. एवढेच नाही तर नारायण गावाला नारायणगाव हे नाव पडण्यामागे काही इतिहास आहे. या ठिकाणी श्री नारायणांचे प्रकटीकरण झाल्यामुळे येथील असणाऱ्या गडाला नारायण गड असे म्हटले जाते. व या नारायण गडावरून या गावाला नारायणगाव असे नाव पडले.

    अशाप्रकारे या दोन्हीही महा तेजस्वी चैतन्य मायास्वरूप असणाऱ्या नाथ योग्यांच्या तपस्येचे, साधनेचे तेज असणारे हे ठिकाण व याच ठिकाणाहून अनेक दुखी लोकांचे दुःख दूर होऊन येणाऱ्या भाविक भक्तांचे कल्याण होते, व आशा प्रकारे येणारे भक्त मायास्वरूप दादागुरु बाडेबाबा मच्छिंद्रनाथ यांच्या मायेत लिन होतात. म्हणूनच तर म्हंटले आहे की ,

    || दर दर भटके नाथों के घर अटके ||

    अलख निरंजन आदेश आदेश आदेश . . .