परमपूज्य सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजय कुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान सिद्ध योगी होते. त्यांचा जन्म आषाढ शुद्ध नवमी शके १८५९ (१ ६ जून १९३७) रोजी रायगड जिल्ह्यात पाली येथे झाला. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले श्री देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते त्यामुळे शिस्तप्रियता व्यवस्थितपणा त्यांना प्रिय होता उच्चशिक्षित असले तरीसुद्धा स्वभावात शालीनता होती.
मुंबईला नोकरीला असताना पोंडीचेरी येथील महान योगी श्री अरविंद घोष यांचे भक्त श्री मुखर्जी यांच्याशी त्यांचा संपर्क आला श्री मुखर्जीनी महाराजांना अनेक चमत्कार करून दाखवले. त्यामुळे महाराज प्रभावित झाले त्यांनी मुखर्जींना आपल्याला गुरुमंत्र देण्याची विनंती केली. पण मुखर्जींनी मी तुझा गुरु नसून लवकरच तुला एक महान सद्गुरु लाभणार आहेत व माझ्यापेक्षाही अनेक मोठे चमत्कार तू स्वतःच करून दाखवशील असे सांगितले. काही दिवसांनी त्यांना आंध्र प्रदेशातील मंत्रालयम येथील समाधी स्थळ श्री राघवेंद्र स्वामींनी दृष्टांत देऊन गुरुमंत्र दिला आणि दीक्षांत नाव देवेंद्र असे ठेवले.
महाराजांच्या घरात पूर्वापार नाथ पूजा आणि पोथी पारायण होत असल्याने त्यांच्यावर नाथपंथाचा प्रभाव होता. एकदा ते मठी येथे चैतन्य कानिफनाथ यांच्या दर्शनाला गेले असताना कानिफनाथांनी प्रत्यक्ष दर्शन दिले मी तुझी बऱ्याच वर्षापासून वाट पाहत आहे असे सांगून या मंदिराला आलेली अवकळा व पूजेतील उणिवा सांगितल्या. तसेच तू येथे जीव ब्रह्म सेवा कर असे सांगितले महाराजांनी मठी हीच आपली कर्मभूमी आहे हे जाणले व येथेच आपले कार्य केले.
चैतन्य कानिफनाथ यांच्या आदेशानुसार श्री नाथपंथी द्वैताद्वैत पिठाची स्थापना गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिनांक ६/७/१९७४ रोजी केली, व सांसारिक असलेल्या आपल्या भक्तजनांना शिष्यांना साधकांना हटयोगी शिबिरे अलख निरंजन या माध्यमातून जीव ब्रह्म सेवा व जीव ब्रह्म सेवेतून अध्यात्मिक उन्नती प्राप्त कशी करावी याचे मार्गदर्शन केले. दर अमावस्येला मयूर टेकडीवर बसून भस्म समाधी घेत असत विश्वशांतीसाठी ८ मे ते १२ मे १९७९ शिवयाग महान यज्ञ त्यांनी केला.
श्री नवनाथांच्या सर्व विद्या शक्ती किमया सामर्थ्य आणि
हठयोग उच्च योगसाधना प्राप्त झालेली अलौकिक असामान्य
व्यक्ती म्हणजे परम पूज्य श्री देवेंद्रनाथ
. विजय कुमार
सुळे यांची म्हणजे नाथांची अलौकिक तेज ज्ञान साधना प्राप्त
झालेली सजीव मूर्ती होय. श्री देवेंद्रनाथ
यांच्या
घराण्यांमध्ये पूर्वापार ७० वर्षांपासून नाथ भक्ती होती.
त्यांची आई मच्छिंद्रनाथांची उपासक होते. त्यामुळे
नाथपंथाचे आकर्षण त्यांना लहानपणापासून होते.
अहिल्यादेवी नगर परिसरात अनेक नाथपंथी स्थानी आहेत. पाथर्डी,
शेवगाव, गर्भगिरीच्या परिसरात मायंबा, चेतन्य
मच्छिंद्रनाथ, मठी
कानिफनाथ, येवलवाडी येथे जालिंदरनाथ,
जामखेड नजीक चिंचोली गहिनीनाथ, डोंगरगण येथे गोरक्षनाथ
मंदिर असल्यामुळे श्री देवेंद्रनाथ
परिसराकडे आकर्षित
झाले.
सद्गुरु श्री देवेंद्रनाथ व्यवसायानिमित्त अहिल्यादेवी नगर
येथे
गेले असता तेथे मठी
मुक्कामी त्यांना कानिफनाथांचा
साक्षात्कार झाला. ते म्हणाले,
"बेटे कितने दिनों से मैं तुम्हारी राह देख रहा था l यह वैदिक पाठ, होम हवन होता नहीं l जीव ब्रह्म सेवा नहीं होती l यह काम तुम करो".
यानंतर परम पूज्य श्री देवेंद्रनाथांनी मठी
येथे तर
अमावस्येला जीव ब्रह्म सेवा, भस्म समाधी वगैरे विधी सुरू
केले. तेथील गोरगरिबांची सेवा सुरू झाली. बघता बघता
प्रवचने, शिबिराच्या माध्यमातून शेकडो शिष्य साधक सेवाभावी
लोकांचा एक संप्रदाय निर्माण झाला.
देवेंद्रनाथ यांची जीव ब्रह्म सेवा हे नाथपंथाचे मोठे आकर्षण. त्यामुळे मठी ची जत्रा वाढली. "मुकम करोति वाचालम् । पंगुं लंघयते गिरिम ।" या उक्तीची सार्थता त्यांनी पटवली. त्याही पुढे जाऊन त्यांनी देवळाचा जीर्णोद्धार, गडावर पाणी, पेपर मेल, आयुर्वेदिक वृक्षांची लागवड कितीतरी अफाट कल्पना सत्यात उतरवल्या. राजस्थान धुळे नेपाळ अशा कित्येक ठिकाणी लांबच्या पल्ल्याचे कितीतरी प्रवास करून त्यांनी नाथपंथासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती मिळवली. देवेंद्रनाथ हे हिंदू संतांपैकी एक आहेत , नवनाथ संप्रदायाचे शिष्य विद्यार्थी आहेत . त्यांचे मूळ नाव विजयकुमार सखाराम सुळे आहे आणि त्यांच्या दीक्षेचे नाव देवेंद्रनाथ आहे जे स्थानिक लोकांमध्ये सुळे बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत . महाराष्ट्रातील अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात ते अधिक सक्रिय होते. राघवेंद्र स्वामी (मंत्रालयम, आंध्र प्रदेश) हे त्यांचे गुरु होते. देवेंद्रनाथ हे आधुनिकतावाद आणि अध्यात्मवाद यांचे मिश्रण होते. देवेंद्रनाथांनी "नव ध्यान योग" तंत्र देखील तयार केले जे तुलनेने कमी कालावधीत "निर्विकल्प समाधी" प्राप्त करण्यासाठी जलद प्रगती करण्यास मदत करते. तंत्रात 9 सोप्या चरणांचा समावेश आहे. त्यांनी मधी येथे "शिव याग" केला, जो गुरुदेव मच्छिंद्रनाथ (नाथपंथाचे संस्थापक) यांच्यानंतर कोणीही केला नाही असे मानले जात होते . त्यांनी "अलख निरंजन" मासिक सुरू केले जे देवत्वाचे खरे साधकांना ज्ञान देण्याचे माध्यम होते. त्याच्या नंतरच्या काळात त्याला "साम्रस्य सिद्धी" ने आशीर्वाद दिला होता, जो नाथपंथी सिद्धींमध्ये एक सर्वोच्च सिद्धी होती. ३ मे १९८२ रोजी त्यांनी समाधी घेतली. त्यांचे समाधी मंदिर मठी येथील कानिफनाथ मंदिराशेजारी आहे . त्यांच्या अनुयायांनी श्री कानिफनाथ मंदिरातून सहज लक्षात येईल असा सुंदर आश्रम बांधला आहे.